महाराष्ट्र मंडळ अॅटलांटा गुढी पाडवा २०१४

नमस्कार मंडळी!!

महाराष्ट्र मंडळ २०१४ समितीच्या सर्व सभासदांकडून आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे नूतन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा...

नवीन वर्षाच्या शुभेच्छा जानेवारी महिन्यात देऊन झाल्या आता पुन्हा कशाला असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे. पण मंडळी असे चकित होऊ नका. चैत्र महिना, मराठी महिन्यातला पहिला महिना, म्हणजे नवं वर्षाचा पहिला दिवस!  तर या मराठी नवीन वर्षाचा शुभारंभ आपल्या गुढी पाडव्याच्या कार्यक्रमाने होणार आहे.

चैत्र मास जो वसंत ऋतूची चाहूल घेऊन येतो. शिशिरात पानगळ होऊन शुष्क झालेली सृष्टी कोवळी कोवळी हिरवी चैत्र पालवी लेवून रंगी बेरंगी फुलांची उधळण करत निसर्गाचे रूप पालटून टाकते.  सारा आसमंत फुलांच्या मादक गंधाने धुंद होऊन जातो. आंब्याला नुकताच मोहोर फुटू लागलेला असतो. आंब्याच्या डहाळीवर बसलेल्या कोकीळेचे कूजन मनाला मंत्रमुग्ध करत असते. अशा या धुंद माहोलात कवीला सुद्धा आपल्या मनाला बांध घालून आपल्या भावना आवरता येत नाही आणि नकळत कागदावर पंक्ती उमटतात…………

              अंबुवा डाल पर कोयल बोले, मनका भेद पपीहा खोले
              भंवरा छेड के गीत सुनाता, सोता प्रेम जगाता
              कली, कली मुसकाती, आई बसंत रितू मदमाती......

तर या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आम्ही सुद्धा सज्ज झालो आहोत आणि आपल्यासाठी एक इंद्रधनुष्या सारखा रंगीबेरंगी कार्यक्रम ...'गीत संग्राम'... शनिवार दिनांक २६ एप्रिल २०१४ ला घेऊन येत आहोत. येथील स्थानिक कलाकारांनी वेळात वेळ काढून गेले काही महिने, दिवस-रात्र ह्या  कार्यक्रमावर मेहनत घेतली आहे. त्यांच्या या मेहनतीचे चीज करायला आणि आपल्या या स्थानिक, गुणी कलाकारांना प्रोत्साहन द्यायला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल याची आम्हाला खात्री आहेच.

आमच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.

 • दुपारी १२.०० ते .०० भोजन .
  • खवैय्याकडून मिळालेली दाद लक्षात घेऊन यावेळेस ही आम्ही 'थाळी' च्या सुग्रास भोजनाची आपल्यासाठी व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्याला पुरेपूर मराठमोळे भोजन देण्याचा प्रयत्न केला आहे.  यावेळेस ही तुमच्याकडून अशीच दाद मिळेल अशी आशा करतो.
 • दुपारी .०० ते .०० - महिला वर्गासाठी चैत्रगौर सजावट आणि हळदी कुंकू
  • महिला वर्गासाठी यावेळेस आम्ही चैत्र गौरीची आरास आणि  हळदीकुंकू आयोजित केले आहे. तर समस्त महिला वर्गानी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा. जोडीला थंडगार पन्हे  आणि चटपटीत आंब्याची  डाळ आहे.  सर्व सभासदांनी (पुरुष व महिला ) न चुकता ह्याचा आस्वाद घ्यावा
 • दुपारी .०० ते .०० - आमच्या छोट्या दोस्तांसाठी सिनेमा व करमणुकीचे मजेदार  खेळ
 • दुपारी .३० ते .०० - प्रमुख कार्यक्रम, गीत संग्राम
  •  स्थानिक कलाकारांमधील छुप्या कला गुणांना वाव देणारा दृक श्राव् रंगारंग  कार्यक्रम
 • संध्याकाळी .०० ते . - चहा पाण्याचा कार्यक्रम
 • संध्याकाळी . ते .३० - गीत संग्राम कार्यक्रमाचा उर्वरित भाग
 • संध्याकाळी .३० - कार्यक्रमाची सांगता 

  कृपया आपली उपस्थिती १५ एप्रिल पर्यंत आम्हाला कळवावी . तसेच कृपया आपण सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही सदिच्छा.

    ‘आरंभ हा चैत्रमासाचा, गुढ्या तोरणे सण उत्साहाचा!
    घास घेऊन श्रीखंड पुरीचा, करू साजरा गुढीपाडवा!
    सरो दुःख आपदा, जीवनी येवो मांगल्य सदा!
    महाराष्ट्र मंडळ २०१४ समिती देई नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!’

 
आगामी कार्यक्रम: कौशल कट्टा ( कौशल ईनामदार )
१० मे २०१४, ४:३० ते ७:३०
आपली कृपाभिलाषी

महाराष्ट्र मंडळ २०१४ समिती

Update your Email Subscription

Developed by jtemplate

Developed by jtemplate

MMA Events ...

http://mmatlanta.org/modules/mod_image_show_gk4/cache/nonmma.vibhagk-is-110.jpglink
http://mmatlanta.org/modules/mod_image_show_gk4/cache/nonmma.ICMSgk-is-110.pnglink
http://mmatlanta.org/modules/mod_image_show_gk4/cache/nonmma.kaushal Katta 2gk-is-110.jpglink
«
»
Fair

36°F

Atlanta

Fair

Humidity: 60%

Wind: 3 mph