1. मंडळाची वार्षिक सभासद वर्गणी आहे का? वार्षिक सभासद वर्गणी आहे. कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी हे आपल्या सर्वांनाही सोयीचे आहे,
    सभासद वर्गणी खालीलप्रमाणे: वैयक्तिक (एकट्यासाठी) - $७५ कुटुंब (२ व्यक्ती) - $१५५ कुटुंबातील मुले (प्रत्येकी) - $२५ आई वडील (प्रत्येकी) - $५०

  2. मराठी मंडळात सहभागी होण्याने काय साध्य होते? कार्यक्रमांच्या निमित्ताने अॅटलांटातील मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरे केले जाणारे उत्सव पाहून पुढील पिढीलाही आपल्या भाषेची आणि संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते.

  3. स्वयंसेवक म्हणून मला मराठी मंडळाच्या कार्यक्रमात मदत करता येईल का? हो, आपले स्वागतच आहे. मंडळाला स्वयंसेवकांच्या बहुमूल्य मदतीची नेहमीच आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी ईमेल द्वारे कळवण्यात येईल.

  4. RSVP देणे का आवश्यक आहे? आपली RSVP खूप महत्वाची आहे. RSVP म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असल्याचे कळवणे. RSVP देण्यासाठी मंडळाच्या ईमेलमधे दिलेल्या लिंकचा उपयोग करावा. कार्यक्रमाला उपस्थित रहणाऱ्यांची संख्या आधी समजल्याने कार्यक्रम जास्त चांगल्या प्रकारे आयोजित करायला खूप उपयोग होतो.

  5. कार्यक्रमात अमराठी भाषिक सहभागी होऊ शकतात का ? हो नक्कीच ..! मराठी भाषा आणि संस्कृती विषयी उत्सुकता असणाऱ्या अमराठी भाषिकांचे मंडळाच्या कार्यक्रमात नेहमीच स्वागत आहे, पण सर्व कार्यक्रम मराठीत असतात याची कृपया नोंद घ्यावी.