महाराष्ट्र मंडळ अॅटलांटा

मुखपृष्ठ कार्यक्रम गुजगोष्टी सभासदत्व कार्यकारिणी विश्वस्त चित्रसंग्रह जाहिराती ब्लॉग बातम्या प्रश्नोत्तरे संपर्क साधा
English | मराठी

ग्रँड लेझीमचा श्री गणेशा

१४ जुलै ला अत्यंत उत्साहात ग्रँड लेझीमच्या सरावाची सुरुवात झाली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खुप जोश दाखवला. असा हा सराव येत्या दर शनिवारी होणार आहे. जेणेकरून सगळ्या इच्छूकांना सराव करायला पुरेपूर वेळ मिळेल. अजूनही कोणाला ह्यात भाग घ्यायचा असल्यास खालील लिंक वर आपली नाव नोंदणी करा.


नाव नोंदणी साठी क्लिक करा
छायाचित्रे

गुढीपाडवा

३१ मार्च २०१८ ह्या दिवसाची नोंद आपण सर्वांनी केली असेलच. गुढीपाडवा, रामनवमी, वसंत ऋतू अशा सर्वांचे औचित्य साधून नवीन वर्षाचे स्वागत आपण मोठ्या दिमाखात करणार आहोत. काही अपरिहार्य कारणांमुळे पूर्व-नियोजित “हसवा फसवी” हे नाटक त्या दिवशी होऊ शकणार नाही ह्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. त्याऐवजी महाराष्ट्र मंडळ सर्व सदस्यांसाठी विविधरंगी“मराठी मेळा” आयोजित करीत आहे. प्रतिवर्षी प्रमाणे शोभायात्रा, सहभोजन तर आहेच; पण त्याचबरोबर सर्व सदस्यांसाठीअंताक्षरी,"पैठणी शोकेस स्पर्धा ", इनडोओर गेम्स,आउट डोओर गेम्स, लहान मुलांसाठी मनोरंजन अशा धमाल कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चला मग लागू तयारीला.


गुढी पाडव्यासाठी आरएसव्हीपी
पैठणी शोकेस स्पर्धेसाठी साइनअप करा
शोभयात्रा स्पर्धेसाठी साइनअप करा

मराठी अस्तित्व

 

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे राजा बढेंच्या लेखणीतून साकारलेले अजरामर गीत सातासमुद्रा पार आजही आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देते. कारण आहे, महराष्ट्राचा दैदीप्यमान इतिहास, अलौकीक किर्ती आणि प्रगल्भ संस्कृति. ह्याचा वारसा जतन करुन ठेवण्यासाठी आपण महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून एकत्र येतो. त्याच उद्देशाने ग्रेस एंटरटेनमेंट घेवून येत आहे मराठी अस्मिता उजळवणारा एक अद्भूत सांगितिक कार्यक्रम “मराठी अस्तित्व”. त्यासाठी 14 एप्रिल 2018 ह्या दिवसाची नक्की नोंद करून ठेवा.

संगीत नियोजन – ‘झी मराठी सरेगम फेम’ सत्यजीत प्रभू
कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता – मानसी जोशी बेडेकर

फेसबुक पेजला भेट द्या
 

MMA's community service initiatives

 

MMA youth and members packed and dropped food boxes along with other community service organizations like Sewa International for an event organized by the MSG foundation The MSG Foundation, a non-profit, makes its goal to empower people with disabilities by encouraging them to assist people in like or similar position. They have a monthly drive where they procure donated food and pack, drop this off for families.

MMA youth - Suhani Mankar, Sanay Garud, Parth Garud, Naveen Madhavan, Prashant Garud and Sameer Mankar, Mandar Vengurlekar were very active in the Food 4 the hungry drive at Otwell Middle School, between 8:30 am and 11:30 am on Saturday, March 17, 2018.

These energetic Maharashtra Mandal of Atlanta members unloaded the donated food, sorted it, repacked them in boxes, loaded these to the delivery vehicles and helped deliver these to the families. The Maharashtra Mandal of Atlanta members worked selflessly and demonstrated the drive and strength of community service in the Mandal – all this while making new friends and forging stronger bonds with the community.

We look forward to having more Maharashtra Mandal of Atlanta members come forward and demonstrate our desire to be part of and make this a strong and vibrant community in Atlanta, Georgia!

If you would like to join Maharashtra Mandal of Atlanta future community service campaigns and programs, please contact MMA by sending email.
Event photos

मकरसंक्रात - महाराष्ट्र मंडळ ॲटलांटाच्या २०१८ च्या नवनिर्वाचित समितीचा पहिलावहिला कार्यक्रम उत्साहात साजरा

 

मराठी व भारतीय संस्कृती चा दिवा तेवत ठेवण्याचा प्रयत्न म्हणुन जगभरातील ‘महाराष्ट्र मंडळं’ नानाविध कार्यक्रम आयोजित करत असतात. असाच एक प्रयत्न म्हणजे शनिवार दि. २७ जाने २०१८ च्या संध्याकाळी महाराष्ट्र मंडळ ॲटलांटा चा मकरसंक्रांत निमित्तचा सांस्कृतिक कार्यक्रम. शिस्तबध्द स्वागत, हळद-कुंकु, तीळगुळ, वाण, बोरन्हाण, बच्चेकंपनी साठी मॅजिक शो, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘ओल्या सांज वेळी’ या रोमॅंटीक थीम वर एक स्कीट व त्यात गुंफलेली चौदा मराठी-हिंदी गाणी अन् शेवटी अस्सल मराठमोळ्या जेवणाचा पोटोबा असा भरगच्च रंगतदार कार्यक्रम ॲटलांटा परिसरातील ५००/५२५ हौशी मराठीजन प्रेक्षकवृंदाच्या उपस्थितीत संपन्न झाला. जानेवारी महिन्यात निवडलेल्या ह्या थीम ला वरुणराजाने देखील हलकी भुरभुर चालु ठेवत अलवर संयुक्तिक साथ दिली.

उत्कृष्ट गायन व सोबतीला दमदार वाद्यवृंद संच...याने कार्यक्रम बहारदार झाला....आपापले कामकाजाचे व्याप सांभाळुन महिना-दीडमहिना अगोदर पासुन पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांनी घेतलेले अविश्रांत परिश्रम यशस्वी न होते तर नवलच...!

मराठीपण व मराठीमन हा सामाईक धागा मराठीजनांना नेहमीच एकत्र आणत असतो. म्हणुनच कार्यक्रम यशस्वी करण्यात आबालवृध्द मावळ्यांचा सहभाग होता हे विशेष. जेष्ठांनी बनविलेली खुसखुशीत तीळवडी, सर्व वयोगटांचा अनेक रंगी, विविधढंगी पतंग बनविण्याच्या स्पर्धेतला सहभाग, ते जेवण वाढतांनाचा किशोरवयीन चमुचा दांडगा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

MMA अर्थात महाराष्ट्र मंडळ ॲटलाटाची स्थापना १९८६ साली झाली. दरवर्षी मराठी कला, साहीत्य, नाट्य, नृत्य व भारतीय सण यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र मंडळ ॲटलांटा अनेक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करत असतात. २०१८ च्या नवनिर्वाचित समितीचा हा वर्षातला पहिला कार्यक्रम सुपर यशस्वी झाल्याने पुढील सर्व कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांच्या आशा तर उंचावल्या आहेतच पण मंडळास ही नवचैतन्य प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे ‘महाराष्ट्र मंडळां’ मार्फत ‘महाराष्ट्र देशा’ चे गुणगान सातासमुद्रापार अविरत होत राहणार यात तीळमात्र शंका नाही.